डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 15, 2025 3:51 PM | Ahilyanagar

printer

अहिल्यानगरमध्ये कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातलेल्या अल्प्रझोलम या औषधासह १३ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.