अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या विकासासासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर

अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या विकासासासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आराखड्यातील सर्व कामं मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं यंदा त्रिजन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्तानं चौंडी इथं ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन विभागाच्या बैठकीत याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला.  

 

तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकासाकरिता १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होणार आहे.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.