डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांची जयंती साजरी

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांची जयंती साजरी होत आहे. जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे उपस्थित आहेत. यावेळी  विविध विकासकामांचा आज प्रारंभ केला जाणार आहे.

 

सुराज्य म्हणजे काय हे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनातून दिसून येतं, त्या महाराष्ट्राच्या अभिमान होत्या, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. सरकारी खजिना हा लोकांसाठी असतो ही शिकवण अहिल्यादेवींनी दिली, स्वतःच्या मुलीचं आंतरजातीय लग्न लावून जातीभेदाला गाडण्याचं काम केलं. त्यांनी माणुसकी आणि कल्याणाचा धर्म पाळला, असं शिंदे म्हणाले. 

 

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. राज्य सरकारने चौंडी इथल्या विकास आराखड्यासाठी ६८१ कोटी मंजूर केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. जयंती उत्सवाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं होतं. मात्र ते येऊ शकले नाहीत. पण पुढच्या वर्षी प्रधानमंत्र्यांनी यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे, असं शिंदे म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा