महिला आणि बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना महाराष्ट्र सरकारतर्फे दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिला जातो. अलिकडेच २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर झाले. जाहीर झालेल्या पुरस्कारांत चंद्रपूर जिल्ह्यातल्या नीता पंत्त, जागृती फाटक आणि अॅडव्होकेट क्षमा बासरकर-धर्मापुरीवार यांचा समावेश आहे. तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगावच्या गोकुळचंदजी विद्यालय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता मालकर आणि सवित्रा गायकवाड यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
Site Admin | November 9, 2025 8:42 AM | Ahilyabai Holkar Award
महिला आणि बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर