अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या अंमळनेर ते बीड या टप्प्याचं उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. या मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पुढच्या ३ ते ४ महिन्यांत पूर्ण होईल, असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिलं.
ही गाडी रेल्वेच्या इंजिनावर धावेल तेव्हा वेग वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील, असं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार बजरंग सोनावणे, रजनी पाटील, आमदार पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रेल्वेचे अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते.