पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज पुण्यतिथी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांना आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशातून अभिवादन केलं आहे. कुशल प्रशासक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनी त्रिवार वंदन असं मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समाज माध्यमावर ‘अहिल्यादेवी या कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचं मूर्तिमंत प्रतीक होत्या.
त्यांचं सेवाभावानं ओतप्रोत असं सामाजिक परिवर्तनाचं अतुलनीय कार्य आजही प्रेरणादायी आहे’, अशा शब्दात अहिल्यादेवींना अभिवादन केलं आहे. अत्यंत कुशल प्रशासक, उत्तम संघटक, न्यायप्रिय आणि दूरदृष्टी असलेल्या लोक कल्याणकारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.