Ahamadabad Plane Crash : DNA चाचणीत १६२ मृतांची ओळख

अहमदाबाद विमान अपघातातल्या १६२ मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे. गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सांघवी यांनी ही माहिती दिली. विमानातल्या इतर कर्मचाऱ्यांच्या तसंच अनेक प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरु आहे.

 

दरम्यान, या विमानाचे कप्तान सुमीत सभरवाल यांच्या मृतदेहाचा डीएनए जुळल्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं. मुंबईत आज त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. याच अपघातात मृत्यूमुखी पडलेली पनवेलची विमान कर्मचारी मैथिली पाटील हिच्यावरही उरण जवळ न्हावा इथं आज अंत्यसंस्कार करण्यात आले.