Agusta Westland Chopper Scam: आरोपी क्रिस्टअन मायकेल जेम्सचा जामीन मंजूर

ऑगस्ता वेस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातला आरोपी क्रिस्टअन मायकेल जेम्स याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं आज मंजूर केला. या घोटाळ्यात तो मध्यस्थ म्हणून काम करत होता, असा आरोप त्याच्यावर आहे. गेली ६ वर्ष तो कोठडीत असून या प्रकरणाचा तपास अजूनही चालूच आहे. त्यामुळे त्याचा जामीन मंजूर करत असल्याचं न्यायालयानं सांगितलं.