September 24, 2024 1:32 PM | Shivraj Singh Chouhan

printer

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत शेतकऱी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली. आपण जवळपास ५० शेतकरी नेत्यांशी चर्चा करून त्यांचे मुद्दे जाणून घेतल्याचं चौहान यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी  तिचा आत्मा आहेत, असंही ते म्हणाले. शेतकरी नेत्यांनी पिकांचे दर आणि पिक विमा याबद्दल अनेक सूचना केल्याचंही चौहान यांनी  सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.