डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कृषीमंत्र्यांच्या हस्ते महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण कार्यशाळेचे उद्धाटन

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. कृषी विभागातर्फे महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण कार्यशाळेचा उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.

 

मानव विरहित शेती, ‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज, हवामान अनुकूल पीक पद्धती, काटेकोर सिंचन पद्धतींचा विकास, जिल्हास्तरावर शेती प्रयोगशाळा उभारणे, शेतीसाठी मोबाईल व्हॅन, पीक साठवणूक सुविधा वाढवणे, यावर शासनाचा भर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिली जावी यासाठी महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण शासन राबवत असल्याचं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा