कृषी विभागाच्या पथकानं अमरावतीतून प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्याची अडीच हजार पाकिटं जप्त केली आहेत. जप्त केलेल्या या बियाण्यांची किंमत २५ लाख रुपये आहे.गुजरातमधल्या अहमदाबादमधून अमरावतीमार्गे नागपूरला जाणाऱ्या खासगी बसच्या तपासणीत हा साठा आढळून आला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. यापूर्वी कृषी विभागाच्या पथकानं जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यासंदर्भात सहा कारवाया केल्या असून त्यापैकी ५ कारवायांमधे जप्त केलेला माल गुजरातमधून आल्याचं उघडकीला आलं आहे.