स्वदेशनिर्मित अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. डी आर डी ओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा पल्ला २ हजार किलोमीटरचा असून रेल्वेमार्गावर चालत्या प्रक्षेपण यंत्रणेद्वारे प्रक्षेपित होणारं हे पहिलंच क्षेपणास्त्र आहे. फिरत्या यंत्रणेमुळे हे क्षेपणास्त्र कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावरून, कमी प्रकाशात आणि त्वरित प्रक्षेपित करता येणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल डी आर डी ओ , स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सैन्यदलाच अभिनंदन केलं आहे.