डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ओदिशातल्या चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरूनअग्नी-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

अग्नि ४ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं ओदिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरून काल यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. या प्रक्षेपणामुळे क्षेपणास्त्राच्या सर्व तांत्रिक बाबींची यशस्वी पडताळणी झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. हे प्रक्षेपण स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. देशाची संरक्षण क्षमता बळकट करण्यात हे प्रक्षेपण मैलाचा दगड ठरणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.