ड्रेस कोडच्या वादामुळे मॅग्नस कार्लसनची बुद्धिबळ स्पर्धेतून माघार

जागतिक बुद्धिबळ क्रमवारीतला अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन याला फिडे वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. ड्रेसकोडचं उल्लंघन केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला आणि अपात्र ठरवण्यात आलं या निर्णयावर आपण दाद मागणार नसल्याचं गतविजेता कार्लसन याने म्हटलं आहे.