डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

युक्रेन शांतिपरिषदेची दुसरी फेरी भारतात घेण्याचा वोलोदिमीर झेलेन्सकी यांचा प्रस्ताव

शांतता प्रस्थापित करण्यावर भारताचा दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. युक्रेन दौरा यशस्वीपणे पूर्ण करुन प्रधानमंत्री आज मायदेशी परतले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी विधायक चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहीलं असून युक्रेनमधल्या पाहुणचाराबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

रशिया युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. युक्रेन शांतिपरिषदेची दुसरी फेरी भारतात घ्यावी, असा प्रस्ताव आपण मोदी यांच्याशी चर्चेदरम्यान मांडला असं झेलेन्स्की यांनी काल कीव्ह मधे पत्रकारपरिषदेत सांगितलं. त्यावेळी शांतिस्थापनेच्या कोणत्याही प्रयत्नाला भारताचा पाठिंबा राहील असं मोदी यांनी स्पष्ट केलं.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा युक्रेन रशिया संघर्षावर तोडगा काढण्यात सहाय्यभूत ठरेल, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही देशाचं स्वागत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी म्हटलं आहे.