डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर ४ धावांची माफक आघाडी, मात्र दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी पुन्हा गडगडली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या, सिडनी इथं सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात, भारतानं दुसऱ्या दिवसअखेर आपल्या दुसऱ्या डावात ६ बाद १४१ धावा केल्या आहेत. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ १८१ धावांत गुंडाळला आणि पहिल्या डावात ४ धावांची माफक आघाडी मिळवली. भारताच्या वतीनं मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३ तर जसप्रीत बुमराह आणि नितेश रेड्डी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

 

त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताचा डाव पुन्हा एकदा गडगडला. मात्र ऋषभ पंत यानं ३३ चेंडूत ६६ धावा करत भारताच्या धावसंख्येत मोठी भर घातली. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रविंद्र जडेजा ८ धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर ६ धावा करून खेळपट्टीवर टिकून होते. दरम्यान या सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असलेला जसप्रित बुमराह याला सामना सोडून वैद्यकीय तपासणीसाठी जावं लागल्यानं, त्याच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.