डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

G7 परिषदेत भाग घेतल्यानंतर प्रधानमंत्री कॅनडाहून क्रोएशियाची राजधानी झाग्रेब साठी रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला कॅनडा दौरा आटोपून आज दुपारी क्रोएशियाची राजधानी झाग्रेब इथे पोहोचतील. या दौऱ्यात धोरणात्मक सहकार्यावर द्विपक्षीय चर्चा होण्याची अपेक्षा आहे. यात शिष्टमंडळ पातळीवरची चर्चा, प्रमुख क्षेत्रांमध्ये करार आणि राजकीय-सांस्कृतिक कूटनीती यांचा समावेश असेल. या दौऱ्या दरम्यान, भारत आणि क्रोएशिया दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रातल्या प्रमुख करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. तसंच, २०३० पर्यंत सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाच्या विस्ताराबाबत एक करार होईल. या करारात कला, संग्रहालयं, पुरातत्वशास्त्र आणि माध्यमांचा समावेश असेल. त्याशिवाय झाग्रेब विद्यापीठात हिंदी भाषेच्या प्रसारासाठीही तरतूद असेल.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.