तालिबाननं पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर काल रात्री केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरु झाला आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अन्य ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यांना तालिबानी लष्करानं प्रत्युत्तर दिलं असून, बहरामपूर जिल्ह्यातल्या डुरंड रेषेजवळ अफगाण सैन्यानं केलेल्या कारवाईत १५ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचं अफगाणिस्तानच्या सरकारी सूत्रांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं.
पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात सात ठिकाणी आपण हल्ले केल्याचं तालिबाननं जाहीर केलं आहे. तर काबूल आणि पक्तिका प्रांतांमध्ये पाकिस्ताननं अलिकडेच केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देत, अफगाण सैन्यानं सीमावर्ती भागातल्या हेलमंड, कंदाहार, झाबुल, पक्तिका, पक्तिया, खोस्ट, नांगरहार आणि कुनार या प्रांतातल्या पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले सुरु केले आहेत.
Site Admin | October 12, 2025 2:21 PM | afghanistan pakistan
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरु