संयुक्त राष्ट्रांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागातल्या अशांततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी हिंसाचारावर नियंत्रण आणावं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी रिचर्ड बेनेट यांनी केलं आहे. अफगाणिस्तानच्या कंदाहार प्रांतातल्या स्पिन बोल्डाक जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या मोठ्या चकमकीनंतर त्यांनी हा इशारा दिला आहे.
पाकिस्तानी सैनिकांनी आज पहाटे ४ च्या सुमारास सीमाभागात केलेल्या मोठ्या हल्ल्यात किमान १२ अफगाणी नागरिक ठार तर १०० जण जखमी झाल्याचा आरोप तालिबानच्या प्रवक्त्याने केला आहे.