पाकिस्तानच्या विनंतीवरून अफगाणिस्ताननं शस्त्रसंधी करायला संमती दिली आहे. तालिबानचे प्रवक्ते झबिनुल्ला मुजाहिद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या स्पिन बोलडक भागात हल्ला केला. त्यात १२ अफगाणी नागरिक ठार, तर १०० पेक्षा जास्त जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानच्या सशस्त्र दलांनी अनेक पाकिस्तानी जवानांना ठार केलं. तसंच त्यांची ठाणी, शस्त्रास्त्रं आणि रणगाडे ताब्यात घेतल्याचा दावा तालिबाननं केला. या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली होती.