अफगणिस्तानमध्ये आज सकाळी पुन्हा एकदा ४.१ रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्र बिंदू भूगर्भात १४० किलोमीटर खोलवर नोंदवण्यात आलं. याआधी सोमवारी ४ पूर्णांक ४ दशांश रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता.
अफगाणिस्तानचा हा भाग भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या भेेगांवर असल्यामुळे इथं भूकंपाचं सातत्यानं धक्के बसत असतात. गेल्या महिन्यात ४ तारखेला ६ पूर्णांक तीन दशांश रिक्टर स्केलचा भूकंप झाला. त्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला होता तर ९५६ हून अधिक जण जखमी झाले होते.