अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमादलांमध्ये चकमक, एकंदर २२ जण ठार

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमा दलात सीमेवरील चौक्यांवर झालेल्या चकमकीत १९ पाकिस्तानी सैनिक तर तीन अफगाणी नागरिक ठार झाले. पाकिस्तानच्या सीमेनजिक पूर्व अफगाणिस्तानातल्या खोस्त आणि पक्तिका प्रांतात या चकमक सुरू आहेत. अफगाणिस्तानच्या सीमा दलांनी पाकिस्तानच्या अनेक चौक्यांना आग लावली आहे. पक्तिका प्रांतात मंगळवारी पाकिस्तानी सैन्यानं हवाई हल्ले केले होते. त्यात ५१ जण ठार झाले होते. त्यानंतर या चकमकी झडत आहेत. तालिबानी शासन सीमेपलिकडून दहशतवादी कारवाया करत असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपानंतर दोन्ही देशांत तणाव वाढला आहे.