अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी आज आग्रा येथील ताजमहालला भेट देणार आहेत. ते आठवडाभराच्या राजनैतिक दौऱ्यावर भारतभेटीसाठी आलेले आहेत.
दिल्लीमध्ये वाणिज्य संघटनेने आयोजित केलेल्या उद्योग आणि व्यवसाय प्रतिनिधींच्या बैठकीतही ते सहभागी होतील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशीही मुत्ताकी यांची स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता असून, त्यामध्ये सुरक्षा, दहशतवादाला विरोधी, मानवतावादी मदत तसंच अफगाण विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी व्हिसा हे विषय चर्चेला येऊ शकतात, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
Site Admin | October 12, 2025 10:25 AM | Afghan Foreign Minister Maulvi Amir Khan | taajmahal
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी आज आग्रा येथील ताजमहालला भेट देणार
