कोल्हापूर चित्रनगरीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण तसंच पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचा भूमिपूजन समारंभ, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या सकाळी होणार आहे. गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध विकास कामांमध्ये रेल्वे स्टेशन चित्रीकरण स्थळ, नवीन वाडा, चाळ, मंदिर, अंतर्गत रस्ते, दोन वसतीगृहे इत्यादी कामांचा समावेश आहे. नागरिकांसाठी कोल्हापूर चित्रनगरी उद्या निशुल्क खुली ठेवण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाहू स्मारक इथं उद्या सायंकाळी ६ वाजता चित्रसूर्य या सांगितिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Site Admin | June 27, 2025 4:24 PM | adv. ashish shelar | chitra nagari | Kolhapur
कोल्हापूर चित्रनगरीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण तसंच भूमिपूजन समारंभ ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते होणार
