डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमरावतीत साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

दिवाळीच्या तोंडावर कर्नाटकातून अमरावतीत आलेला साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा अन्न आणि औषधी प्रशासनानं आज जप्त केला. जप्त केलेल्या खव्याची किंमत अंदाजे दहा लाख रुपये आहे. शहरातील जुना बायपास मार्गावर एका गोदामात भेसळयुक्त खवा आल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, कर्नाटक, गुजरात राज्यांतून मोठ्या प्रमाणावर अवैध आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ येत असल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.