मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी १० जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी १० जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी २७ जून ही अंतीम तारीख होती. कुणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी मुंबई विद्यापीठानं ही मुदतवाढ दिल्याचं म्हटलं आहे.