डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

टेमघर प्रकल्पाच्या मजबुतीकरणाच्या कामांसाठी 315 कोटी रूपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता

पुणे जिल्ह्यातल्या टेमघर प्रकल्पाची गळती रोखण्यासाठी आणि त्याचं मजबुतीकरण करण्याच्या कामांसाठी 315 कोटी 5 लाख रूपयांच्या खर्चाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.
टेमघर धरणाला प्रकल्पाला गळती लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. धरणाची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना केल्यानंतर शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
शासकीय भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी सवलतीच्या दरानं अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेला वर्षभराची मुदत वाढ देण्याकरता मान्यता देण्यात आली. भाडेपट्टयानं दिलेल्या जमिनींच्या रुपांतरणाची अनेक प्रकरणं प्रलंबित असल्यानं ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात कोयना जलाशयामध्ये 25 बुडीत बंधारे बांधण्यासाठी 170 कोटी रूपयांची तरतूद करण्याच्या कामालाही काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.