डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आदित्य ठाकरेंनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. ही भेट मैत्रीपूर्ण भेट असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे यांनी काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्ली इथे भेट घेतली. या दोघांमध्ये निवडणूक आयोगावर ईव्हीएम संदर्भात केलेल्या आरोपांबाबत चर्चा झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.