आदि कर्मयोगी अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार म्हणजे पालघर जिल्ह्यातल्या आदि कर्मयोगी, आदि सहयोगी तसंच आदि साथी यांनी केलेल्या अथक परिश्रमांचं फळ आहे. हा सन्मान पालघर जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकास कार्याची, विशेषतः आदिवासी भागांच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची पोचपावती ठरला आहे.
Site Admin | October 20, 2025 7:48 PM | aadi karmayogi abhiyaan
आदि कर्मयोगी अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार