विद्यमान कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदार ओळखपत्रं आधार कार्डाशी जोडली जाणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं ठरवलं आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज केंद्रीय गृह, संसदीय कार्य, तसंच इलेक्ट्रॉनिक्स तसंच माहिती तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत नवी दिल्लीत आज बैठक घेतली, त्यात हा निर्णय झाला.
यासंदर्भात आधार प्राधिकरण आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांची चर्चा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं निवेदनाद्वारे दिली आहे.