देशातल्या आधार प्रमाणित व्यवहारांच्या एकूण संख्येने दीडशे अब्जांचा टप्पा ओलांडला आहे. आधारचा व्यापक प्रमाणातला वापर आणि देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीचं हे प्रतिबिंब आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एकट्या एप्रिल महिन्यामध्ये दोनशे दहा कोटी आधार प्रमाणित व्यवहार झाले. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापेक्षा हे प्रमाण आठ टक्क्यांनी जास्त आहे.