डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

एडीबीच्या नियामक मंडळाच्या 58व्या वार्षिक बैठकीला आजपासून इटलीमध्ये सुरुवात

आशियाई विकास बँकेच्या म्हणजेच एडीबीच्या नियामक मंडळाच्या 58व्या वार्षिक बैठकीला आजपासून इटलीमध्ये सुरुवात होणार आहे. या चार दिवसीय बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत.

 

त्याचबरोबर, एडीबीचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीचे अध्यक्ष आणि जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशनच्या गव्हर्नरांसमवेत बैठका घेतील, तसंच सीतारामन इटली, जपान आणि भूतान च्या अर्थमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चादेखील करणार आहेत. त्याचबरोबर मिलानमधल्या भारतीय समुदायाशीही त्या संवाद साधणार आहेत. तसंच बोकोनी विद्यापीठातल्या एका चर्चासत्रालाही सीतारामन उपस्थित राहाणार आहेत.