ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. मंतरलेली चैत्रवेल, लेकुरे उदंड जाहली, संकेत मीलनाचा ही त्यांची काही गाजलेली नाटकं तर नवरी मिळे नवऱ्याला, मायबाप, आत्मविश्वास, उंबरठा हे काही गाजलेले चित्रपट आहेत. दूरदर्शन वाहिनीवरच्या गजरा या कार्यक्रमाचं निवेदनही दया डोंगरे यांनी केलं होतं.
Site Admin | November 3, 2025 7:13 PM | Daya Dongre
ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन