तामिळ चित्रपटसृष्टीतले विनोदी अभिनेते माधवन बॉब यांचं काल संध्याकाळी चेन्नईमध्ये निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. त्यांनी कमल हसन, रजनीकांत, अजित, सूर्या आणि विजय यांच्यासोबत काम केलं आहे.
सुमारे ६०० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यात तमिळ प्रमाणेच हिंदी, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमधल्या चित्रपटांचा समावेश होता. त्यांच्या निधनाबद्दल त्यांचे सहकारी कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.