डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि अभिनेते माधव वझे यांचं निधन

प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्य समीक्षक माधव वझे यांचं आज सकाळी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. केंद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये’ सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला सुवर्ण कमळ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या ‘श्यामची आई’ या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून श्यामची भूमिका केली होती. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना पदकं मिळाली होती. डिअर जिंदगी, थ्री इडियट्स या हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहिल्या. ते पुण्याच्या वाडिया महाविद्यालयातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.