डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य हिंसेला चिथावणी देणारं असल्यानं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असून, मानसिक संतुलन देखील ढळलं आहे, त्यामुळेच लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्याबाबत अशी भाषा ते वापरत आहेत. पण राज्यातली जनता हिंसक वृत्ती बाळगणाऱ्यांना योग्यवेळी धडा शिकवेल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.