January 21, 2025 7:22 PM

printer

बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई

पुणे शहर परिसरात प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या  घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

 

पुणे स्टेशन आणि महर्षि परिसरातून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महर्षीनगर भागात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकाकडून परदेशी चलनही जप्त करण्यात आलं.