नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुंबईच्या राजभवनात राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च नायायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांनी आचार्य देवव्रत यांना पदाची शपथ दिली. आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपास्थित होते. माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. आचार्य देवव्रत हे २०१९ पासून गुजरातचे राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली होती.