डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारनं केली १२० लाख मेट्रीक टन भाताची खरेदी

यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारनं, १२० लाख मेट्रीक टन भाताची खरेदी केली आहे. त्यामुळे पंजाबमधे साडेसहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा २७ हजार ९९५ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, अ श्रेणीच्या धानासाठी निर्धारीत २३२० रुपये प्रति क्विंटल दरानं किमान आधारभूत किंमतीनं खरेदी केली जात आहे. केंद्र सरकारनं येत्या महिनाअखेरीपर्यंत यंदाच्या खरीप हंगामात १८५ लाख मेट्रीक टन भारतखरेदीचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे.