महाराष्ट्रात रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना ६ लाख रुपये नुकसानभरपाई द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज संबंधित महानगरपालिकांना दिले.
तसंच, अशा दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्यांना ५० हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई द्यावी, असंही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या पीठानं सांगितलं.
चांगले आणि सुरक्षित रस्ते हा राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचा भाग आहे, याचा पुनरुच्चारही पीठानं केला.