डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 18, 2025 2:50 PM | accidents

printer

देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू

पंजाबमधल्या फरीदकोट इथं खासगी बस नाल्यात पडून आज सकाळी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवताना बसच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं वृत्त आहे.

 

कुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला ट्रकने धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन गंभीर जखमी आहेत. उत्तरप्रदेशातल्या इटवाह इथं कानपूर-आग्रा रस्त्यावर काल रात्री उशीरा हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

बंगळुरूमधे काल रात्री साडे अकरा वाजता भरधाव वेगात जाणाऱ्या कारने झाडाला धडक दिल्यामुळे कारमधे बसलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.