ठाणे जिल्ह्यातल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा काल अपघाती मृत्यू झाला. त्या ७३ वर्षाच्या होत्या. ग्राहक चळवळ, पर्यावरण संरक्षण, नेत्रदान अशा विविध क्षेत्रात त्यांनी कार्य केलं.त्यांच्या इच्छेनुसार अंतिम संस्कारापूर्वी त्यांचे नेत्रदान करण्यात आले. त्या पत्रकार आशिष आगाशे यांच्या मातोश्री होत्या. दरम्यान या अपघाताची चौकशी पोलीस करत आहेत.
Site Admin | January 24, 2025 3:55 PM
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा अपघाती मृत्यू
