डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

समृद्धी महामार्गावर जालना हद्दीत झालेल्या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर जालना हद्दीत झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. कडवंची गावाजवळ दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारसाठी जालना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलय.

 

सदर घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेन साह्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केलाय.