देशात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमधे किमान १० जणांचा मृत्यू झाला.
मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथं आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. झाशीहून येणारी फॉर्च्युनर कार, वाळून भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकल्यानंतर कारमधले ५ जण जागीच मरण पावले. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढे तपास सुरु आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये बडगाम इथं काल झालेल्या अपघातात किमान चारजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
उत्तरप्रदेशात सोनभद्र इथं खाणीत अडकून एकाचा मृत्यू झाला, तर १० पेक्षा जास्त कामगार अद्याप अडकले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरफ तसंच स्थानिक प्रशासन मदतकार्य करीत आहे.