डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 19, 2024 10:19 AM | Accident

printer

राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू

सिन्नरहून मुंबईकडे दूध घेऊन निघालेला दुधाचा टँकर काल दुपारी कसारा घाटातील दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला; तर चौघे जखमी झाले आहेत. टँकर भरधाव वेगात कसारा घाट उतरत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि लोखंडी संरक्षक कठड्याच्या जाळ्या तोडून अंदाजे 250 फूट खोल दरीत तो कोसळला.

रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या सावित्री नदीपात्रात बुडून काल तीन जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकानं तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. सावित्री नदी पलीकडे असलेल्या दर्ग्यात दर्शनासाठी जात असताना एकाचा पाय घसरून तो नदीपात्रात बुडू लागला, त्याला वाचवायला गेलेले दोघेही बुडून मरण पावले.