१९ वर्षांखालच्या क्रिकेटमध्ये आशिया चषक स्पर्धेत आज दुबई इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला ९० धावांनी पराभूत केलं. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं ४६ षटकं आणि एका चेंडूत २४० धावा केल्या. एरॉन जॉर्जनं सर्वाधिक ८५ धावा केल्या. कनिष्क चव्हाणनं ४३, तर कर्णधार आयुष म्हात्रेनं ३८ धावांचं योगदान दिलं.
भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४१ षटकं आणि २ चेंडूत १५० धावात गारद झाला. भारतातर्फे दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चव्हाण यांनी प्रत्येकी ३ तर किशन सिंगनं २ गडी बाद केले.