डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान

भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना काल पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान करण्यात आला.

 

ऑलिम्पिक ऑर्डर हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. ऑलिम्पिकमधील योगदानाची दखल घेत अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात आलं. बिंद्रानं २००८ बीजिंग इथं झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत १०-मीटर एअर रायफल स्पर्धेत भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकलं होतं. आपल्या कारकिर्दीत १५० हून अधिक वैयक्तिक पदकं अभिनव बिंद्रानं मिळवली आहेत.