आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा समूह विमा काढला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारीत येणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. त्याविषयी माहिती देताना शिंदे आज वार्ताहरांशी बोलत होते.
गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षीही आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबिरं आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
याशिवाय गेल्यावर्षी वारीत अपघाती मृत्यू आलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाईल, पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल, असंही त्यानी सांगितलं.