आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधी, पाच कॅबिनेट मंत्र्यांनीही घेतली शपथ

आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी काल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी आतिशी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत या आपच्या पाच नेत्यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आतिशी यांनी आपल्यावर विश्वास दाखवून दिल्लीतील जनतेची सेवा करण्याची मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले. दिल्लीतल्या रखडलेल्या विकासकामांना आपण गती देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.