आदि कर्मयोगी अभियानात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार

देशातल्या प्रत्येक आदिवासी गावाला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने आदिकर्मयोगी अभियान सुरू करण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल आयोजित करण्यात आलेल्या ‘आदि कर्मयोगी अभियान’ या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेला त्या संबोधित करत होत्या. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समुदाय, राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवासात सहभागी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ‘धरती आबा जनभागीदारी अभियाना’त सर्वोत्कृष्ट राज्याचा मान महाराष्ट्र राज्याला मिळाला असून, आदि कर्मयोगी अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी पुरस्काराचा मान गडचिरोली जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले.